तलावाच्या प्रतीक्षेत जलप्रेमी!
By Admin | Updated: January 3, 2015 00:02 IST2015-01-02T21:12:29+5:302015-01-03T00:02:03+5:30
क्रीडा संकुल : पाणी गळतीचे काम सुरू असल्याने महिन्यापासून जलतरण बंद

तलावाच्या प्रतीक्षेत जलप्रेमी!
सातारा : छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील पोहण्याचा तलाव अनेक दिवसांपासून बंद असल्याने जलप्रेमींची कोंडी झाली आहे. क्रीडा कार्यालयातर्फे तलावाची गळती काढण्यात येत असल्याने तलाव बंद ठेवण्यात आला आहे.
क्रीडा संकुलातील तलाव प्रशस्त असल्याने यात राज्य व राष्ट्रीय स्पर्धा होतात. मात्र, अनेक दिवसांपासून या तलावाला लागलेल्या गळतीमुळे तलावातील पाणी वाया जात होते. या तलावाची क्षमता २५ लाख लिटर इतकी आहे. लिकेजमुळे सुमारे २५ ते ३0 हजार लिटर पाणी वाया जात होते. वाया गेलेले पाणी पुन्हा भरावे लागत असल्याने हा तलाव रोज सुरु ठेवण्याची कसरत करावी लागत होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जलतरण तलावाच्या शेजारचा डायव्हिंग पूल सुरु करण्यात आला व तलावाची गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ज्या ठिकाणापासून पाणी वाया जात होते. तो भाग उकरण्यात आला आहे. आऊटलेट पाईपला चार ठिकाणी गळती लागली होती. तसेच तलावातील फरशीच्या दर्जा भरण्याचे कामही हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होईपर्यंत जलतरणप्रेमींना आता वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
+
४क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे सुरु असलेले काम.
४याठिकाणी असणाऱ्या डायव्हिंग पुल खोल असल्याने त्यात नवशिक्यांची गोची होत आहे.
तलावातून मोठ्या प्रमाणावर गळती होत होती. ही गळती काढणे आवश्यक असल्याने त्याचे काम हाती घेतले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत काम पूर्ण होऊन तलाव पोहण्यासाठी खुला केला जाईल.
- उदय जोशी, जिल्हा क्रीडाधिकारी
पाण्याची कमतरता
क्रीडा संकुलात जरी मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी याठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे खेळाडूंचे म्हणने आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे याठिकाणी मुबलक पाण्याची सोय करावी, अशी मागणी खेळाडूंमधून होत आहे.