शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा वाढला; साताऱ्यातील कास धरणाचा साठा घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:01 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण १९ जून २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरून सातारकरांची पाण्याची चिंता ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण १९ जून २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली. सद्य:स्थितीला शहराला दररोजचा पाणीपुरवठा, वातावरणात उष्णता वाढल्याने बारा फूट पाणीपातळीत घट झाली. गतवर्षीच्या तुलनेत सद्य:स्थितीला एक फुटाने पाणी कमी असले तरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कास धरणाची उंची वाढविल्यानंतर मागील तीन वर्षांपासून पावसाळ्यात मृत पाणीसाठा वगळता ६१.०४८ फूट पाणीसाठा होत आहे. कास धरणाची पाणीपातळी २०२५ मध्ये मार्च महिन्याच्या उत्तर पंधरवड्यात ५० फुटांवर होती. १९ जून २०२५ मध्ये सांडव्यावरून धरण ओव्हरफ्लो झाले. पाणीपातळीत घट होत असली तरी मुबलक प्रमाणात धरणात पाणीसाठा शिल्लक असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न मिटला आहे; परंतु पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.कास धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाकडून पूर्ण होऊन २०२२ च्या तुलनेत गत तीन वर्षांपासून अडतीस फूट अधिक पाणीसाठा होत आहे. धरणाच्या जुन्या भिंतीची लांबी २५० मीटर होती. तिच्यापासून साधारण ६० मीटर अंतरावर नवीन भिंत बांधून तिची लांबी ५८०.५० मीटर, उंची २८.७० मीटर आहे. जुन्या धरणात २३ फूट पाणीसाठा होत होता. धरण पूर्ण झाल्याने २०२२ मध्ये साडे एकोणपन्नास फूट पाणीसाठा झाला. २०२३ व २०२४, २०२५ मध्ये मृतसाठा पावणेअठरा फूट व ६१.०४८ फूट पाणीसाठा, असा एकूण ७८.७२० फूट पाणीसाठा झाला.जुन्या धरणात ११२२.४० मीटर तलांकापर्यंत पाणी अडवले. २०२२ मध्ये धरण पूर्ण झाल्यावर ११३०.५० मीटर तलांकापर्यंत पाणीसाठा झाला तर गतवर्षी ११३४ मीटर तलांकापर्यंत पाणीसाठा होऊन जुन्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या पाचपट पाणीसाठा नवी धरणात झाला आहे.

दीडशे वर्षे ०.१ टीएमसी होणारा पाणीसाठा गत तीन वर्षांपासून ०.५० टीएमसी झाला. आतापर्यंत बारा फूट पाणीपातळीत घट झाली असून, सद्य:स्थितीला धरणात ४९.०४८ फूट पाणीसाठा शिल्लक आहे. - जयराम किर्दत, पाटकरी, कास धरण

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Intensifies; Water Level Drops in Satara's Kas Dam

Web Summary : Kas Dam's water level, supplying Satara, has decreased due to rising heat. Despite a foot less water than last year, sufficient stock remains, averting low-pressure supply concerns. Citizens are urged to prevent water wastage.