शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:31 IST

गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

ठळक मुद्देधोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणीतारळीच्या पाण्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद

संदीप कुंभारमायणी : गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.तारळी प्रकल्प दुष्काळी भागातील गावांच्या पिण्याची व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या विविध गावांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे येत होते. यामध्ये प्रामुख्याने कधी जमीन अधिग्रहण तर कधी निधीची टंचाई निर्माण होत होती.तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्याच्या पूर्व भागात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यांची कामे ही दोन दशकांपासून सुरू होती. म्हणजे गेली दहा वर्षे या कालव्यांची कामे सुरूच आहेत.

यामध्ये प्रामुख्याने धोंडेवाडी येथील जलसेतू सुमारे ४६८ मीटर लांबीचा असून, यामध्ये १५ मीटर अंतराचे ३१ गाळे आहेत तर जमिनीपासून या जलसेतूची उंची ५ ते १२ मीटर इतकी आहे. दीड बाय दीड मीटर अंतरातून जलसेतूचे काम सुरू होते. अनेक अडथळे निर्माण होत गेली आणि विविध कारणांमुळे या भागात पाणी देण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा उभा होता. मात्र, परिसरात गतवर्षीपासून सुरू असलेल्या जनआंदोलनमुळे काम पूर्ण झाले.या उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे, यासाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून या धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांतील ग्रामस्थ जनआंदोलन करत होते. यामध्ये रस्ता रोको, निवेदन, अधिकाऱ्यांच्या भेटीत सातत्य राहिल्यामुळे व भागातील माजी आ. प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुुुुदगे, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, विजय शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात आज पाणी आल्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

गेल्या तीन महिन्यांपासून या पाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अधिकाऱ्यांकडून ही सकारात्मकता मिळत नव्हता. पाणी सोडायचे कसे येथून पाणी सुटेपर्यंत संघर्ष करावा लागला. पाणी सुटले त्यानंतर पुरेसा दाब नसल्याने पाणी पुन्हा बंद झाले. त्यामुळे पाणी येते का नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जनआंदोलनामुळे हे पाणी धोंडेवाडीसह नऊ गावांच्या शिवारात दाखल झाले आहे.-हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी, खटाव 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर