जलसंधारणाच्या कामाची झाली फलश्रुती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:35 IST2017-10-04T14:32:51+5:302017-10-04T14:35:27+5:30
सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच परिसरात जलसंधारणाच्या कामाची फलश्रुती झाल्याने पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे.

सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे.
पिंपोडे, 4 : सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच परिसरात जलसंधारणाच्या कामाची फलश्रुती झाल्याने पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे.
सोनके येथील वसना नदीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ यांच्या काळात विविध निधीतून बंधारे बांधण्यात आले. आता सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने हे बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाºयातील पाण्यामुळे परिसरातील पाणीतपाळीत चांगली वाढ झाली आहे.
विहिरी, क कूपनलिकांना पाणी आले आहे. त्यामुळे शेतकºयांना रब्बी हंगामाबाबात श्वास्वता निर्माण झाली आहे. दरम्यान, या परिसरात झालेल्या पावसामुळे घेवडा, वाटाणा पिकांचे नुकसान झाले असलेतरी परिसरातील जलस्त्रोत वाढल्याने शेतकºयांची चिंता संपली आहे.
नदीतील बंधाºयात पाणीसाठा झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. शेतकºयांनी व्यक्तिगत पातळीवर मोकळ्या जमिनीवर समतल चर, वृक्षलागवड सारखी कामे करून पाणीपातळी वाढवण्यास हातभार लावावा.
- दत्तात्रय धुमाळ,
माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ
दुष्काळ, अवर्षण ही नैसर्गिक आपत्ती असलीतरी उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर व्हावा. पावसाचे पाणी जागीच मुरवण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
- सतीश धुमाळ,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य