शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी, ग्रामस्थांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 13:14 IST

आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोचल्याने जनावरांचा व चार गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

ठळक मुद्देबलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी, ग्रामस्थांत समाधानचार गावच्या पाणीपुरवठा योजना सुरू राहणार

आदर्की : आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोचल्याने जनावरांचा व चार गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात मुळीकवाडी धरण १९७२ मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले होते. या धरणावरून नांदल, मुळीकवाडी येथील पोटपाटाने जमीन ओलिताखाली आली होती. काही जमीन उपसा जलसिंचनमुळे ओलिताखाली आली होती.नांदल, मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड गावात पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण पंधरा दिवसांपूर्वी आटल्याने पाणी पुरवठा योजना धोक्यात आली. यासंबंधी लोकमतने मुळीकवाडी धरण आटले; चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात या आशयाचे असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेऊन बलकवडी कालव्यातून बीबी मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते बीबी घाडगेवाडी येथील बंधारे भरून पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचले आहे. आता पाणी साठा होऊ लागल्याने चारपाच गावांच्या जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. तीस ते चाळीस टक्के पाणीसाठा झाल्यानंतर चार गावांच्या पाणी पुरवठा योजना पुर्ववत सुरू होवून पाणी प्रश्न मिटणार आहे.

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर