पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:33+5:302021-02-05T09:08:33+5:30

.................... बाजारात गर्दी सातारा : ग्रामीण भागामध्ये भरणाऱ्या आठवडाबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. ...

Waste of water | पाण्याची नासाडी

पाण्याची नासाडी

....................

बाजारात गर्दी

सातारा : ग्रामीण भागामध्ये भरणाऱ्या आठवडाबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिने आठवडाबाजार बंद करण्यात आला होता. मात्र, सध्या काही भागातील गावाचे आठवडाबाजार पूर्ववत भरू लागले आहेत.

.........

चार भिंतींवर पथदिवे बसवण्याची मागणी

सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या चार भिंतींवर रात्री अंधाराचे साम्राज्य असल्याने याठिकाणी पथदिवे बसवावेत, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

चार भिंतींवरून संपूर्ण सातारा शहर दिसत असून रात्री पथदिव्यांचे प्रकाशमय सातारा पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र, रात्री या ठिकाणी अंधार असल्याने येणाऱ्या पर्यटकांची याठिकाणी गैरसोय होत आहे. याठिकाणी अंधाराचा फायदा घेत काही जण मद्यपान करत असतात. त्यामुळे पथदिवे लावावेत, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

...,............

भुयारी मार्गात पादचाऱ्यांना प्रवेश बंद

सातारा : पोवईनाक्यावर नव्याने झालेल्या भुयारी मार्गातून पादचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून, याबाबत वाहतूक शाखेकडून पादचाऱ्यांना सूचना देण्यात येत आहे.

साताऱ्यातील पोवईनाक्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचा अनेक पादचारी येण्याजाण्यासाठी वापर करत आहेत. मार्गात ४० स्पीडने वाहने ये-जा करत असल्याने पादचाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मार्गाचा वापर करू नये, अशी सूचना वाहतूक शाखेने केली आहे. दरम्यान, गुरुवारी या मार्गावर प्रवेश बंद असलेले फलकही लावले असून, या सूचनेचे पादचाऱ्यांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे.

........

मांजामुळे जातोय पक्ष्यांचा जीव

सातारा : शहरातील अनेक ठिकाणी पतंगाच्या मांजात पक्षी अडकून पडतात, काही जखमी होतात, तर काहींना जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टर पतंग उडविण्यासाठी साधा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. येथील शनिवार पेठेत मांजर अडकले होते, त्याला जीव गमवावा लागला.

...........................

वाहतुकीचा खोळंबा

सातारा : सातारा शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते आधीच अरूंद असून, या रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वच रस्त्यावर लगतच्या गाळ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा उरली नसल्याने ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा ठरत आहेत.

...............................

एसटी स्वच्छतेची गरज

सातारा : राज्य परिवहन महामंडळातर्फे एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवाळी झाली असल्याने एसटीला गर्दीही वाढत आहे. लांब पल्ल्यांच्या गाडीत प्रवासी सतत चढत व उतरत असतात. त्यामुळे निर्जंतुकीकरण करणे शक्य नसते. त्यामुळे आतमध्ये स्वच्छता राखण्याची गरज आहे.

............

झाडांची बेसुमार तोड

सातारा : साताऱ्याच्या चारही बाजूंना मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या ठिकाणी अनेकदा चोरून झाडांची बेसुमारपणे तोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वनविभाग तसेच नागरिकांनी वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

००००००००००

शहरात डांबरीकरण

सातारा : सातारा शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मोठमोठे खड्डे पडले होते. त्यांच्या दुरुस्तीची वारंवार मागणी केली जात होती. आता या ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे साताराकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. इतरत्रही डांबरीकरणाची मागणी होत आहे.

०००००००

दवाखाना परिसरात हॉर्न

सातारा : येथील महाविद्यालय परिसरात तसेच शासकीय रुग्णालय परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

.......................

Web Title: Waste of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.