कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST2021-07-15T04:27:09+5:302021-07-15T04:27:09+5:30
रामापूर : ‘पाटण शहरात सध्या नगर पंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचबरोबर शहरातील कचऱ्याचा प्रश्नही लवकरात लवकर ...

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार!
रामापूर : ‘पाटण शहरात सध्या नगर पंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचबरोबर शहरातील कचऱ्याचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लवकरच उभा करू. त्यामुळे शहराला कचऱ्यापासून होणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळेल. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीतच टाकावा,’ असे आवाहन पाटण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. पाटण शहरातील प्रभाग आठमधील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक किरण पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘नगर पंचायत स्थापन झाल्यापासून पाटण शहरातील प्रत्येक प्रभागात कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक किरण पवार यांच्या प्रयत्नातून शहरामध्ये काँक्रिट रस्ते, गटार, दोन हायमास्ट दिवे अशाप्रकारची दर्जेदार कामे करून या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्या या प्रभागात गटार व रस्त्यांची कामे हाती घेतली असून, ती दर्जेदार कशी होतील, याकडे नागरिकांनीही लक्ष द्यावे.’
शिवलिंग मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील, अक्षय देसाई, संतोष इंदुलकर, उमेश खैरमोडे, अनिल लुगडे, सोन्या आडके, दीपक साळुंखे, सचिन देसाई, राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत देसाई, नंदकुमार मोळावडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
फोटो : 14 केआरडी 03
कॅप्शन : पाटण येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी किरण पवार, सत्यजितसिंह पाटणकर, अजय कवडे, विजय टोळे, आदी उपस्थित होते.