जास्तीत जास्त बक्षिसांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST2021-08-28T04:42:45+5:302021-08-28T04:42:45+5:30

जास्तीत जास्त बक्षिसांसाठी भटकंती दहीहंडी फोडण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. सराव न झालेल्या गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्यात अपयश येते. तरीही ...

Wandering for maximum rewards | जास्तीत जास्त बक्षिसांसाठी भटकंती

जास्तीत जास्त बक्षिसांसाठी भटकंती

जास्तीत जास्त बक्षिसांसाठी भटकंती

दहीहंडी फोडण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. सराव न झालेल्या गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्यात अपयश येते. तरीही पथकात असलेल्या कार्यकर्त्यांवर होणारा खर्च भरून निघावा, यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त बक्षिसे मिळविण्यासाठी दहीहंडी पथकांना गावभर भटकंती करावी लागते. मोठ्या शहरांमध्ये हे अंतर जास्त असते. मात्र, चालत आपण किती किलोमीटर आलो होतो, हेही तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळेही दुसऱ्या दिवशी थकवा आल्याचे जाणवत असते.

चौकट

अशी घ्यावी काळजी

पाण्याच्या फवाऱ्याचा मार लागू नये म्हणून कानामध्ये कापूस घालून ठेवावा

आपल्या गावातून परगावी जाण्यासाठी शक्यतो चार काठी वाहनांचा वापर करावा

गोविंदाला हेल्मेट किंवा इतर सुरक्षा साधनांचा पुरवठा करावा

आयोजकांनी काळजी घेतलेली असली तरीही पथकात स्वतःचाही एक डॉक्टर सोबत घेतल्यास तातडीने मदत उपलब्ध होऊ शकते.

पथकात गोविंदांची संख्या जास्त ठेवून गोविंदांचा वापर करावा. एका ठिकाणी दहीहंडी फोडल्यानंतर दुसरीकडे अन्य गोविंदांना संधी द्यावी.

Web Title: Wandering for maximum rewards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.