भिंती पडल्या.. झाडे उन्मळली ! सातारा जिल्'ात मुसळधार पावसामुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:15 IST2017-09-14T21:14:18+5:302017-09-14T21:15:57+5:30

सातारा : सातारा, वाई, कºहाड, महाबळेश्वर, पाटणसह जिल्'ाच्या पूर्व भागालाही पावसाने गुरुवारी सुखद धक्का दिला.

 The walls fell down .. the trees disappeared! In Satara district, due to heavy rain | भिंती पडल्या.. झाडे उन्मळली ! सातारा जिल्'ात मुसळधार पावसामुळे हाहाकार

भिंती पडल्या.. झाडे उन्मळली ! सातारा जिल्'ात मुसळधार पावसामुळे हाहाकार

ठळक मुद्देदुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली१५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने दिलाफलटण तालुक्यात गेली तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सातारा : सातारा, वाई, कºहाड, महाबळेश्वर, पाटणसह जिल्'ाच्या पूर्व भागालाही पावसाने गुरुवारी सुखद धक्का दिला. फलटण तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले. या पावसामुळे फलटण तालुक्यात अनेक घरांच्या भिंती पडल्या. शेतांमध्ये जागोजागी पाणी साठून राहिले होते. जोरदार वाºयाने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर शेकडो झाडे मोडून पडल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. साताºयात गुरुवारी सायंकाळच्या वेळेत विजांचा जोरदार कडकडाट झाला.
फलटण तालुक्यात गेली तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व इतर आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनामान्यात १३ लाखांहून जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ही आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. नांदल येथील सर्वच बंधारे भरून वाहिले. वाठार-निंबाळकर परिसरात ताथवडे तलाव तसेच ढवळ, झडकवाडी, तरडफ, उपवळे आदी गावांतील ओढ्यांवरील बंधारे ओसंडून वाहिले.
कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले आठवडाभर शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कºहाड तालुक्यात तर गेल्या आठवड्यापासून पावसाची मुसळधार सुरूच आहे.
साताºयासह दक्षिण महाराष्ट्रात शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर गुरुवारी जोरदार वाºयाने शेकडो झाडे उन्मळून पडल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 

Web Title:  The walls fell down .. the trees disappeared! In Satara district, due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.