धामणेरला घराची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST2021-07-24T04:23:24+5:302021-07-24T04:23:24+5:30
धामणेर : धामणेर व रहिमतपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. धामणेर येथील ...

धामणेरला घराची भिंत कोसळली
धामणेर : धामणेर व रहिमतपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. धामणेर येथील लक्ष्मण राजे यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली असून, यामध्ये त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रहिमतपूर सातारा रस्त्यावर पावसाचे पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसामुळे शेती जलमय झाली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतांचे बांधदेखील वाहून गेले. लागणीच्या उसामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रहिमतपूर येथील नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला.
फोटो :२३ धामणेर
धामणेर येथे झालेल्या पावसामुळे लक्ष्मण राजे यांच्या घराची भिंत कोसळली.
(छाया : शशिकांत क्षीरसागर)