महिलांना येतायत अश्लील फोन
By Admin | Updated: February 9, 2015 00:47 IST2015-02-08T21:33:58+5:302015-02-09T00:47:43+5:30
फलटण पोलीस ढिम्म : कारवाई करण्याची मागणी

महिलांना येतायत अश्लील फोन
फलटण : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून फलटण शहर व ताुक्यातील घरगुती दूरध्वनी महिलांना लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरल्याने फलटणमधील महिला धास्तावल्या असून, भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. पोलिसांकडेही तक्रारी दाखल झाल्या असून, गेल्या आठ ते पंधरा दिवसांत पोलीसही काही करू शकत नसल्याने ढिम्म पोलीस यंत्रणेचा फलटणकरांना अनुभव येत आहे. त्यांना जाग कधी येणार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून फोन करणाऱ्या व्यक्तीचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त महिलांमधून होत आहे.गेल्या १५-२० दिवसांपासून फलटण शहरातील जवळपास ४०-५० जणांच्या लँडलाईन व मोबाईलवर एकच अज्ञात व्यक्ती फोन करत असून, घरातील महिलांना अश्लील वाक्ये बोलून त्रास देत आहे. हे फोन दिवसा रात्रीअपरात्री करत असून, या फोनमुळे महिलांना मानसिक त्रास तर होतच आहे. परंतु अख्खं कुटुंबच या फोनमुळे त्रस्त झाले आहे. अनेक उच्चभ्रू लोकांच्या घरीही अज्ञात व्यक्ती फोन करीत असून, हे लोक पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळत आहेत. तथापि काहीनी पोलिसांकडे आपली तक्रार लेखी व तोंडी कळवली असून, पोलीस ही याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.इतर वेळेला छोट्या गुन्ह्यावरही अती गांभीर्याने पाहणाऱ्या पोलीस यंत्रणेस वारंवार सांगूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु एकाच व्यक्तीने फोन करून अनेक कुटुंबांना ओलीस ठेवल्याची भावना फलटण शहरात व्यक्तकेली जात आहे. मुळातच फलटण पोलीस स्टेशनला कुंकवाचा धनी नसल्याचे कारभारच ठप्प झाला असून, या ढिम्म कारभाराचा फलटणकरांना फटका बसत आहे.सायबर क्राईमबाबत सार्वजनिक ठिकाणी माहिती देणे. नागरिकांना याविषयी माहिती देऊन जागृत करणे पोलिसांना अनिवार्य असताना अशा गुन्ह्याकडे पोलीसच गांभीर्याने पाहत नसल्याने पूर्ण समाजव्यवस्था कोलमडून पडल्याची चिन्हे दिसत आहेत.
फोनद्वारे महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तीस ताबडतोब अटक करून कायदेशीर कारवाई करावी व अनेक कुटुंबांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी महिला वर्गांतून होत आहे. (प्रतिनिधी)
गेले सात तेआठ महिन्यांपासून फलटण पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक नसल्याने कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. यामुळे गेल्या वर्षभरात फलटण शहरात गुन्ह्यांचे प्रमाण अतोनात वाढले असून, चेनस्रॅचिंग सारख्या प्रकाराने महिला शहरात फिरताना भयभीत व मानसिक अवस्थेत दिसून येत आहेत. मटका, हातभट्टी, गुंडगिरी, चोऱ्या हे सर्व राजरोसपणे सुरू आहे. पण, यास अटकाव कोण घालणार? असा सवाल उपस्थित होत आहे.