वाट पाहू; पण रांगेनेच जाऊ!

By Admin | Updated: December 2, 2014 00:47 IST2014-12-01T20:53:48+5:302014-12-02T00:47:03+5:30

शिस्तीचे धडे: बेशिस्त प्रवाशांसमोर विद्यार्थिनींचा आदर्श

Wait; But go to the queue! | वाट पाहू; पण रांगेनेच जाऊ!

वाट पाहू; पण रांगेनेच जाऊ!

मल्हारपेठ : विद्यालयात शिस्तीचे धडे घेणाऱ्या विद्यार्थिंनी रस्त्यावर सुद्धा शिस्तीचे दर्शन घडवित आहे. मल्हारपेठ बस थांब्यावर ओळीनेच एस. टी. बसकडे जाताना आपल्या शिस्तीच्या संस्काराने जाणीव करून दिली.
पाटण-कऱ्हाड रस्त्यावर मल्हारपेठच्या संत तुकाराम विद्यालयाची सायंकाळची सुटी झाल्यावर पाटणकडे जाणाऱ्या विद्यार्थिंनी त्या वेळेत एस. टी. बसची वाट पाहतात. गाडी येताच एका ओळीने शिस्तबद्ध चालत एस. टी. च्या दिशेने जातात व शाळेत, विद्यालयात घेतलेल्या शिस्तीच्या संस्काराचे दर्शन घडवितात. हे त्या मुलींनी दाखवून दिले. मुलीच संस्काराचे, नियमांचे पालन करतात हे दिसून आले.
गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थिनींना एस. टी. प्रवासासाठी श्री संत तुकाराम विद्यालयाचे शिक्षक यांनी बसथांब्यावर ओळीने उभे राहून शिस्तीने बसमध्ये प्रवासाचे मार्गदर्शन केले. गोंधळ, गर्दी होऊन अघटित काही घडू नये, याकरिता आदर्श नियमांचा पायंडा घालून दिला. त्याचे या मुलींकडून काटेकोर पालन केले जात आहे.
इतर प्रवाशांना दिशादर्शक आदर्श घेण्यासारखे उदाहरण प्रत्यक्ष मल्हारपेठ बसथांब्यावर पाहावयास मिळत आहे. मात्र, मुलांमध्ये अशी शिस्त दिसून येत नाही, याची खंत पालकांना वाटते. (वार्ताहर)

Web Title: Wait; But go to the queue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.