वाई, फलटणला राष्ट्रवादीचा गजर
By Admin | Updated: August 18, 2015 00:44 IST2015-08-18T00:44:18+5:302015-08-18T00:44:18+5:30
बाजार समिती निवडणूक : विरोधकांचा सुफडा साफ; विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण करीत मिरवणूक

वाई, फलटणला राष्ट्रवादीचा गजर
फलटण : तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रामराजे पुरस्कृत राजे गटाने निर्विवाद वर्चस्व राखले. बाजार समितीच्या एकूण १९ पैकी १६ जागांवर विजयी मिळवित राजे गटाने विरोधकांचे पानिपत केले. यापूर्वी राजे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
बाजार समितीसाठी रविवारी तालुक्यात ८९ टक्के मतदान झाले होते. सोमवारी (दि. १७) सकाळी आठ वाजता येथील मालोजीराजे नाईक-निंबाळकर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यापासूनच राजे गट आघाडीवर होता. अकरा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले तेव्हा राजे गटाचे १६ उमेवार विजयी झाले. यापूर्वी राजे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. राजे गटाने १९ पैकी १९ जागांवर विजय मिळवित विरोधकांचे पानिपत केले.
निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : सोसायटी सर्वसाधारण गट मतदार संघातून रधुनाथराजे नाईक-निंबाळकर ११४७, शिवरूपराजे खर्डेकर १२५७, मोहनराव निंबाळकर ११२२ , बबन खोमणे ११२२, विनायक पाटील १२४८, बाळकृष्ण रणवरे १२३६, भीमराव शेडगे १२४५, सोसायटी राखीव महिला मतदारसंघातून कमल शिवाजी लंगुटे १२७३, लता सुदाम सूळ १२५२, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग लक्ष्मण शंकर लोखंडे १३१०, इतर मागास प्रवर्ग प्रकाश बबन
भोंगळे १२७९, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून विजयकुमार शेडगे ७५८, भगवान दादा होळकर ७४३, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल परशुराम फरांदे ७७०, ग्रामपंचायत अनुसूचित
जातींमधून प्रकाश सुखदेव धाइंजे ७६५, हमाल-मापाडी मतदार संघातून बापू हरी करे ४२ हे उमेदवार निवडून आले.
बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कौतुक केले. मतमोजणी नंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत शहरातून विजयी फेरी काढली. (प्रतिनिधी)