दरे खुर्द पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदार यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:10+5:302021-03-09T04:42:10+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील पंचायत समितीच्या दरे खुर्द अबाउट गणाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार बुधवार, दि. १० ...

दरे खुर्द पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदार यादी
सातारा : सातारा तालुक्यातील पंचायत समितीच्या दरे खुर्द अबाउट गणाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार बुधवार, दि. १० मार्च रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
शेंद्रे गटांतर्गत येणाऱ्या दरे खुर्द पंचायत समिती गणाचे तत्कालीन सदस्य हनुमंत गुरव यांचे निधन झाल्याने हा गण रिक्त झाला होता. कोरोना महामारीमुळे या गणाची पोटनिवडणूक घेतली नव्हती. मात्र, प्रशासनाने नुकतीच याबाबत निवडणुकीची घोषणा केलेली आहे.
या निवडणुकीसाठी तालुका प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून बाहेर पडलेल्या प्रशासनावर गणाच्या निवडणुकीची जबाबदारी पडली आहे. निवडणुकीसाठी ठरलेल्या कार्यक्रमानुसार बुधवार, दि. १० रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहेत. कोणाचा प्रभाव वाढत असल्याने निवडणूक घेण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याबाबत आता उत्सुकता लागलेली आहे. निवडणूक लागली तर नामनिर्देशन कार्यक्रम होईल. त्यानंतर छाननी आणि माघार आणि गरज पडल्यास मतदान असा कार्यक्रम होणार आहे.