शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करा अन् आवर्जून लग्नाला या; नवरदेवाचं साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:17 IST

लग्नपत्रिकेवर छापली बॅलेट मशीन

उंब्रज : जीवनात लग्नसोहळा हा आनंदाचा क्षण. या सोहळ्यात वर व वधू लग्नाच्या बंधनाने एकत्र येतातच; परंतु दोन कुटुंबं, नातेवाईक, मित्रपरिवार या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत असतो. अशा आनंदाच्याच दिवशी लोकशाहीतील महत्त्वाचे घटक असलेली मतदानाची प्रक्रिया होत असेल तर या आनंददायी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही म्हणून मतदारराजाने मतदानही करावे आणि लग्नसोहळ्यात उपस्थितही राहावे म्हणून इंदोली येथील युवकाने आपल्या लग्नपत्रिकेत मतदान मशीनचे चित्र छापून मतदान का करावे? याचे प्रबोधन केले आहे.अमोलचा विवाह कामेरी (ता. जि. सातारा) येथील सोनाली घाडगे यांच्याबरोबर ७ मार्चला ठरला. तातडीने विवाहासाठी कार्यालय, वाजंत्री, घोडा ठरवण्यात आले. आणि १० मार्चला निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. सातारा लोकसभेची निवडणूक २३ एप्रिलला जाहीर करण्यात आली. यानंतर चव्हाण व घाडगे कुटुंबात लग्नाची तारीख बदलूया यावर चर्चा झाली. परंतु लग्न सोहळ्यासाठी अनेक गोष्टी ठरवण्यात आल्या असल्यामुळे तारीख बदलता येत नव्हती. मतदानामुळे लग्नास लोक कसे येणार, याची रुखरुखही होती. मात्र, वर अमोल याने वधू सोनाली व दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठांशी चर्चा केली आणि लग्नपत्रिकेतच मतदान करावे. याविषयी प्रबोधन करण्याचे ठरविले. यातून एक आगळी-वेगळी लग्नपत्रिका तयार झाली. हा विवाह सोहळा इंदोली फाटा येथील कार्यालयात २ वाजून ५० मिनिटांनी होणार असल्यामुळे लग्नसोहळ्यास येणाऱ्या प्रत्येकास मतदान करून सोहळयास उपस्थित राहणे शक्य आहे तसेच या सोहळ्यातील वºहाडी मंडळी मतदान करूनच लग्न ठिकाणी जाणार असल्याचेही अमोलने सांगितले.अशी आहे लग्नपत्रिकालग्नपत्रिकेच्या लखोट्यावर मतदान यंत्राचा फोटो छापण्यात आला आहे तर लग्नपत्रिकेत पूर्ण एका पानावर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुकीत मतदान कोणाला व का करावे? याविषयी माहिती दिलेली आहे आणि शेवटी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही प्रकियेत सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmarriageलग्नVotingमतदान