शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घालुनी घाव घणाचे नशीब आजमावितो!

By admin | Updated: January 5, 2016 00:36 IST

शेती अवजारांना झळाळी : परप्रांतीय कारागिरांकडून पाटण तालुक्यात शेतकऱ्यांना सेवा

राजेंद्र लोंढे ल्ल मल्हारपेठ खेडोपाडी शेती औजारं बनविणारी बलुतेदारी पद्धत संपुष्टात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे ग्रामीण कारागीर काळाच्या पडद्याआड गेला आहे. पाटण तालुक्यात त्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कारागीर कुटुंबे या भागातील शेती अवजारांना झळाळी देऊन शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम करत आहेत. पाटण—कराड मार्गावर निसरेफाटा येथे हीच कष्टाची कामे घेऊन आलेत मध्यप्रदेशातील कष्टकरी कुटुंबे. हे कारागीर कुऱ्हाडी, टिकाव फावडे, कुदळ सतुर, भाला, बरचा, नांगर, कुळव, पास, विळा, खुरपे अशा शेती अवजारांना झळाळी देत आहेत. त्यामुळे आपली शेती अवजारे दुरुस्त करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. ही कला पाहण्यासाठीही अनेकजण येथे थांबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारागीरांकडे पाहिल्यानंतर खेडोपाडी बलुतेदारीतून कारागिरी लुप्त होत असल्याचीच आठवण सतावत आहे. कुठे गेले ग्रामीण कारागीर. भाता, तप्त निखारे, ऐरणीवर घाव घालणारी साथीदारीण व लाल भडक लोखंडाला आकार देणारा कारागीर हे दृश्य निसरेफाटा येथे रस्त्याकडेला पाहायला मिळत आहे. कालबाह्य होत चाललेली ही कला आकर्षणाचे केंद्र बनत आहे. लोखंडापासून वस्तू कशा बनवतात, हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने स्थलांतराची वेळ महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय कारागीर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत आहेत. अव्वल दर्जाचे हे कारागीरही त्या प्रांतातील बलुतेदार आहेत. रामसिंग, जसवंतसिंग, धारासिंग लोहार अशी या कारागिरांची कुटुंबं आहेत. कष्टाचे मोल कवडीमोल! मध्यप्रदेशमध्ये आम्हा बलुतेदार कुटुंबांना जमीन व मिळकतीसाठी कोणतेच साधन नाही. यामुळे उदरनिवार्हासाठी महाराष्ट्र, कर्नाटकात शेकडो कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. राहण्यास जागा नाही गावोगावी स्थलांतर होत आहे. यंत्रामुळे पूर्वीसारखी शेती अवजारे राहिली नाहीत. त्यामुळे कष्टातूनही काही मिळकत होईना. कोळसा टाकून भाता फुकून तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव टाकूनही घामाचे दाम मिळेना, याचेच वाईट वाटते, अशी खंत रामसिंग लोहार यांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली.