रहिमतपूर : पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचे चटके सोसणारे कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थ ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत गाव पाणीदार करण्यासाठी एकजुटीने श्रमदान करत आहेत. महिला, वृद्धांसह दिव्यांग व्यक्तीही श्रमदानात हिरीरीने सहभागी होत आहेत. एकमेकांचा हातात हात घेऊन युवकांनी वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचा ध्यास घेतला आहे.बेलेवाडीसह वेळू गामस्थांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत होती. मात्र वेळूकरांनी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केलेल्या जलक्रांतीमुळे पाणीप्रश्न सुटला. त्यांच्या कामाचा आदर्श घेऊनच बेलेवाडीकरांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीतून दररोज ग्रामस्थ वेगवेगळ्या शिवारात जाऊन सुमारे तीन तास श्रमदान करत आहेत. डीपसीसीटी, एलबीएस बंधारे, शेततळे, मातीनाला बांध आदी कामे केली जात आहेत.आई-वडिलांसह मुलेही भल्या पहाटे शिवारात सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत आहेत. काही करून दुष्काळ हद्दपार करायचा, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांचा एकमेकांना मदतीचा हात...अवघी ४५० लोकसंख्या असलेल्या बेलेवाडी ग्रामस्थांनी वॉटर कप स्पर्धेसाठी दमदार नियोजन केले आहे. राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन श्रमदान केले जात आहे.श्रमदान करताना कुणाला काही लागलं, दुखलं, खुपलं तरी एकमेकांच्या मदतीला जात आहेत. या कामाच्या माध्यमातून एकजुटीची व मायेची भावना वाढीस लागली आहे.
वृद्धांसह दिव्यांगांचीही ‘जलक्रांती’साठी धडपड-बेलेवाडी ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:52 IST
रहिमतपूर : पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचे चटके सोसणारे कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थ ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत गाव पाणीदार करण्यासाठी एकजुटीने श्रमदान करत आहेत.
वृद्धांसह दिव्यांगांचीही ‘जलक्रांती’साठी धडपड-बेलेवाडी ग्रामस्थ एकवटले
ठळक मुद्देशिवारात भल्या पहाटे श्रमदानासाठी लगबग; दुष्काळ हटविण्याचा निर्धार