अवघी फलटणनगरी विठ्ठलमय..!

By Admin | Updated: July 2, 2014 00:26 IST2014-07-02T00:21:29+5:302014-07-02T00:26:22+5:30

वारकऱ्यांची आर्त हाक : ईडा-पीडा टळू दे, पाऊस पडू दे!

Vitthalagari Vitthalma ..! | अवघी फलटणनगरी विठ्ठलमय..!

अवघी फलटणनगरी विठ्ठलमय..!

किरण बोळे ल्ल कोळकी पंढरीसी जाय, तो विसरे मायबाप अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग न लगे धन मान, देहभान उदासीन तुका म्हणे मळ, नासी तत्काळ ते स्थळ जगद्गुरू तुकोबारायांच्या संदेशानुसार फलटण मुक्कामी विसावलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक नागरिक आपल्या परीने प्रयत्नशील होता. दरम्यान, राज्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने पालखी सोहळ्यातील यंदा वारकऱ्यांची गतवर्षीच्या तुलनेत संख्या कमी असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ईडा-पीडा टळू दे, पाऊस पडू दे, अशी आर्त हाक भक्तांनी यावेळी माउलींना दिली. यंदा सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे वारीत दरवर्षी सहभागी होणारे वारकरी यंदा मात्र वारीस आले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीत फलटण शहरात असलेल्या पालखी वास्तव्याने शहरात सर्वत्र उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फूर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा असे वातावरण होत. मंगळवारी दिवसभर शहर व परिसरात विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्या वतीने ठिकठिकाणी अल्पोपहार देण्यात आला. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी फलटणनगरी दुमदुमून गेली आहे. दरम्यान, बुधवार, दि. २ रोजी सकाळी साडेसहा वाजता फलटण येथून माउलींचे प्रस्थान होणार असून न्याहरी विडणी येथे, दुपारचे जेवण व नैवेद्य पिंप्रद येथे असू सायंकाळी सहा वाजता बरड येथे पालखी विसावणार आहे.

Web Title: Vitthalagari Vitthalma ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.