कोटा महाविद्यालयास देविदास कुलाळ यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:49+5:302021-02-05T09:14:49+5:30
कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या आयटी (माहिती व तंत्रज्ञान) या विषयाच्या प्रयोगशाळेस देविदास कुलाळ यांनी भेट देऊन इत्यंभूत माहिती ...

कोटा महाविद्यालयास देविदास कुलाळ यांची भेट
कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या आयटी (माहिती व तंत्रज्ञान) या विषयाच्या प्रयोगशाळेस देविदास कुलाळ यांनी भेट देऊन इत्यंभूत माहिती घेतली. तसेच आतापर्यंत कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सतर्फे झालेल्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाचे अधिकारी एस. बी. सय्यद, अमित काटकर, आयटी समन्वयक सुषमा पाटील, गटशिक्षण अधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी नितीन जगताप, जमिला मुलाणी, उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नलवडे उपस्थित होते.
ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे संस्थापक डॉ. महेश खुस्पे व उपाध्यक्षा मंजिरी खुस्पे यांनी स्वागत केले. प्राचार्या जयश्री पवार, लायझनिंग ऑफिसर सुरेश निकम तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वा. प्र.)
फोटो : २९केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडच्या कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी भेट दिली.