वाई : कोरोनाच्या संकटाने जनतेचे कंबरडे मोडले असून याची कोणतीही पर्वा शासनकर्त्यांना दिसत नाही. याच्या निषेधार्थ भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे यांच्या नेतृत्वाखाली वाई येथील किसन वीर चौकात वाई भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीस यशराज भोसले, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष आली आगा, तालुका सरचिटणीस गणेश सुतार, शहर सरचिटणीस देवानंद शेलार, मनीषा घैसास, तनुजा इनामदार, तेजस जमदाडे यांची उपस्थिती होती. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी विक्रम शिंदे, शस्मिता जैन, नरेंद्र महाजन, प्रसाद चरेगावकर, गुलाबराव डोंगरे, तुषार सुळके, राजाभाऊ खरात, गोपाल पुजारी, केशव पिसाळ, सूर्यसिंह जाधवराव, आदेश कोळपे, राहुल जमदाडे व वाई तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वेळी यशवंत लेले, सचिन घाटगे, मनीषा घाईसास, यशराज भोसले, तेजस जमदाडे, विक्रम शिंदे यांनी भाषणे केली.