शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम ! 

By नितीन काळेल | Updated: March 11, 2025 19:33 IST

शाश्वत विकासाकडे वाटचाल : जिल्हा परिषदेचा ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम

नितीन काळेल सातारा : सौरउर्जा काळाची गरज झाली असून, आता सातारा जिल्हा परिषदही जिल्ह्यात ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम राबवत आहे. त्यामधून अधिकाधिक गावे १०० टक्के सौरग्राम करण्यात येणार आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करून हरितउर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने १०० टक्के सौरऊर्जा ग्राम होण्याचा बहुमान नुकताच मिळविला आहे. यासाठी १५व्या वित्त आयोगाचा निधी, माझी वसुंधरा अभियान आणि इतर योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षीस रकमा, लोकवर्गणी, सीएसआर फंड अशा विविध निधीच्या माध्यमातून गाव १०० टक्के सौरऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम करून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.आता सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याअंतर्गत गावे १०० टक्के सौरउर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच या गावांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.पहिल्या टप्प्यात या गावांना शाश्वत उर्जेच्या आधारे उर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मागेल त्याला सौर कृषिपंप, पंधराव्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी, लोकवर्गणी आणि सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून गावाची विजेची गरज गावातच भागवण्यासाठी ही मोहीम आहे तसेच उपलब्ध योजना आणि निधीची कल्पक सांगड घालून ही गावे ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यात येणार आहेत.

शाळा, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांसह घरेही साैरऊर्जेद्वारेसौरग्राम योजनेत गावातील घरे, शाळा ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, पथदिवे आणि इतर कामांसाठी लागणारी १०० टक्के वीज सौरऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हरित ऊर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने ही वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत आहे. तसेच प्रत्येक घराच्या छतावर आता पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेतून गाव ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी १०० टक्के सौर ऊर्जा ग्रामयोजनेत सहभागी व्हावे. तसेच जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन शाश्वत ग्रामपंचायत उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद