परळीत उभारले ग्रामस्वच्छतालय

By Admin | Updated: June 2, 2015 00:28 IST2015-06-02T00:28:42+5:302015-06-02T00:28:42+5:30

कामांचे भूमिपूजन गुरुवार

Villages constructed in Paroli | परळीत उभारले ग्रामस्वच्छतालय

परळीत उभारले ग्रामस्वच्छतालय

परळी : परळी येथे सातारा तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट असे ग्रामसचिवालय परळीत उभारण्यात आले आहे. या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन तसेच इतर कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. ४ जून रोजी होणार आहे.  या कार्यक्रमास विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, वित्त व परिवहन विभागाचे सहसचिव एकनाथ मोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दि. ४ जून रोजी दुपारी बारा वाजता परळीतील भव्य अशा ग्रामसचिवालयाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर उरमोडी जलाशयाच्या पलीकडील असणाऱ्या गावांना दळणवळणासाठी सोईस्कर अशा परळी-अंबवडे मार्गावरील उरमोडी पूलाचे भूमिपूजन सोहळा होणार आहे. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Villages constructed in Paroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.