भवानवाडीत डेंग्यूसदृश आजारामुळे ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST2021-04-22T04:41:06+5:302021-04-22T04:41:06+5:30
उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील भवानवाडी येथे चार दिवसांपासून डेंग्यूसदृश साथीच्या आजाराने ग्रामस्थ आजारी पडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

भवानवाडीत डेंग्यूसदृश आजारामुळे ग्रामस्थ त्रस्त
उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील भवानवाडी येथे चार दिवसांपासून डेंग्यूसदृश साथीच्या आजाराने ग्रामस्थ आजारी पडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने पाहणी करून ग्रामस्थांवर उपचार सुरू केले आहेत.
भवानवाडी येथील काही ग्रामस्थांना चार दिवसांपासून ताप येणे, पाय दुखणे, जुलाब असा त्रास होऊ लागला आहे. यामुळे गावातील असंख्य नागरिक त्रस्त आहेत. ही माहिती मिळताच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक गावात पाठविले. वैद्यकीय पथकाने गावाची पाहणी केली असता, गावाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गंजलेली आहे, तसेच नागरिकांनी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी रांजण, बॅरेलमध्ये साठविल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. वैद्यकीय पथकाने गावातील नागरिकांची भेट घेऊन या साथीच्या आजाराची माहिती दिली. तसेच योग्य त्या सूचना देऊन आजारी रुग्णांवर उपचार सुरू केले.