पुसेसावळी ग्रामस्थांनी विकासाला साथ दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:21+5:302021-02-05T09:11:21+5:30
औंध : पुसेसावळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची पोचपावती येथील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ...

पुसेसावळी ग्रामस्थांनी विकासाला साथ दिली
औंध : पुसेसावळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची पोचपावती येथील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे, त्यामुळे विकासाला साथ देणाऱ्या पुसेसावळीला भविष्यात रोल मॉडेल बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
खटाव तालुक्यातील पळशी येथे विजयी उमेदवारांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती जयश्री कदम, दत्तात्रय कदम, दत्तात्रय रुद्रुके, एस. एस. कदम, महेश पाटील, अशोक कदम, संग्राम पाटील, रवींद्र कदम, रवींद्र सूर्यवंशी, संग्राम माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
घार्गे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने खटाव तालुक्यात अनेक ठोस व कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला या ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांनी गावच्या विकासासाठी झटले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाऊ.’
२५पुसेसावळी
फोटो:- पुसेसावळी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भेटीप्रसंगी माजी आमदार प्रभाकर घार्गे, सभापती जयश्री कदम, महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)