गावकारभाऱ्यांची निवड २६ ते २८ दरम्यान!

By Admin | Updated: August 19, 2015 21:19 IST2015-08-19T21:19:53+5:302015-08-19T21:19:53+5:30

कऱ्हाड तालुका : आठवड्याचा अवधी; गावोगावी सरपंचाच्या निवडीची तयारी

Villagers choose between 26 to 28! | गावकारभाऱ्यांची निवड २६ ते २८ दरम्यान!

गावकारभाऱ्यांची निवड २६ ते २८ दरम्यान!

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २६ ते २८ आॅगस्ट दरम्यान ९७ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची निवड होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर आता सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते. ग्रामीण भागात ज्या गावात सर्वसाधारण गटातील सरपंचपदासाठी निवड करावयाची आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.गावाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्तवाच्या मानल्या जाणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व राहणार आहे याचा फैसला सरपंचपदाच्या निवडीनंतरच होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षातील मंडळींनी देखील या सरपंचपदाच्या निवडीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तर तालुक्यातील हजारमाची येथील ग्रामपंचायतीची सरपंचपदाची मुदत सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. मुदत संपेपर्यंत ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य नामधारी असणार आहेत. (प्रतिनिधी)
२८ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायती
पार्ले, आबईचीवाडी, बामणवाडी, भरेवाडी, भवानवाडी, भुयाचीवाडी, चचेगाव, चिखली, चोरे, धोंडेवाडी, गोळेश्वर, कालवडे, कामथी, करवडी, केसे, खोडशी, खोडजाईवाडी, खुबी, किरपे, कोडोली, म्हारूगडेवाडी, म्हासोली, नांदगाव, नवीन कवठे, सैदापूर, साजूर, साळशिरंबे, शहापूर, शेवाळेवाडी (उंडाळे), वडोली निळेश्वर, वराडे, वसंतगड, येणके या ३३ गावांतील निवडणूका होणार आहेत.

२६ रोजी निवड होणाऱ्या ग्रामपंचायती...
अंबवडे, भोळेवाडी, गमेवाडी, घोगाव, गोटेवाडी, हणबरवाडी, हरपळवाडी, इंदोली, जिंती, कार्वे, काले, खालकरवाडी, कोणेगाव, मालखेड, म्होप्रे, मौजे साकुर्डी, मुंढे, निगडी, रिसवड, शेळकेवाडी, उंडाळे, विरवडे, वडगाव (उंब्रज), वहागाव, वाठार आणि विंग या २६ गावांत सरपंचपदाची निवड होणार आहे.
२७ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायती...
आकाईचीवाडी, बनवडी, बेलवडे बुद्रुक, बेलदरे, बेलवडे हवेली, भुरभुशी, चौगुलेमळा, गायकवाडवाडी, घारेवाडी, घोणशी, गोवारे, खराडे, कोळे, लटकेवाडी, मरळी, नांदलापूर, ओंड, पाचुंद, पाडळी-केसे, पाल, पेरले, पोतले, सवादे, शेवाळेवाडी (म्हासोली), शिरवडे, शिवडे, टाळगाव, वस्ती साकुर्डी, वाघेरी, वाघेश्वर, वारूंजी, येरवळे, गोटे या ३३ गावांतील सरपंचपदाची निवड होणार आहे.

Web Title: Villagers choose between 26 to 28!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.