वणवा रोखण्यासाठी एकवटला गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:10+5:302021-02-07T04:36:10+5:30

या परिसरात प्रादेशिकचे ८ हजार ५०० हेक्टर तर वन्यजीवचे सुमारे ५ हजार हेक्टर एवढे वनक्षेत्र आहे. अनेक वर्षांपासून त्याला ...

A village united to prevent floods | वणवा रोखण्यासाठी एकवटला गाव

वणवा रोखण्यासाठी एकवटला गाव

या परिसरात प्रादेशिकचे ८ हजार ५०० हेक्टर तर वन्यजीवचे सुमारे ५ हजार हेक्टर एवढे वनक्षेत्र आहे. अनेक वर्षांपासून त्याला लागलेले वणव्यांचे ग्रहण आता हळूहळू सुटत चालले आहे. अर्थातच ‘आपले जंगल आपणच वाचवायचे’ ही जनतेत वाढीस लागलेली भावना त्यामागे आहे. वनविभागातर्फे माती बंधारे, वनतळी, समतल सलग चर आदी कामे केली जात असल्याने जंगलालगतच्या गावातील शेती व पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट बनत आहेत. वन्यप्राण्यांचा तजविजीसाठी पाणवठा निर्मिती व त्यांच्या साफसफाईत लोकसहभाग वाढत आहे.

वणवे रोखण्यासाठी प्रतिवर्षी वनविभागातर्फे हाती घेण्यात येणाºया जाळरेषासह विविध उपाय योजनांसाठी गावेच्या गावे एकवटत आहेत. घोटील येथेही असेच चित्र दिसले. तेथील ६२३ हेक्टरमधील वनक्षेत्रास वणव्यांपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ महिला व पुरुषांनी दिवसभर मोठी मेहनत घेऊन सहा किलोमीटरची जाळरेषा तयार केली. वन कर्मचारीही ब्लोअर मशीन घेऊन मदतीस धावले होते.

सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, वन समितीचे अध्यक्ष अंकुश पवार, संतोष पवार, मारुती पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष रमेश पवार, आनंदा बाचुलकर, सीताराम पवार, आनंदा जाधव, लक्ष्मी पवार, नंदा पवार, सविता पवार, हिराबाई जाधव, अश्विनी पवार, नंदा पवार, दीपाली पवार, सुशीलाबाई गोडांबे, रंजना पवार, हिराबाई पवार, हिराबाई जाधव, सुभद्रा जाधव, शालन पाटील, यशोदा पवार, कासाबाई पवार, मीराबाई जाधव, पांडुरंग यादव, सुभाष पवार, सुनील गोडांबे, दत्तू पवार, जोतिराम पवार, तुकाराम व्हलम आदींनी सहभाग नोंदविला.

- चौकट

वन भोजनाचाही घेतला आस्वाद

जाळरेषा काढत असताना सर्वांनी एकजुट दाखविली. तसेच दुपारी सर्वांनी वन भोजनाचाही आस्वाद घेतला. लवकरच शिल्लक वनक्षेत्रातही लोकसहभागातून जाळरेषा काढण्याचे नियोजन आहे. अन्य गावांनीही हा आदर्श घेऊन वनरक्षणाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन वनपाल सुभाष राऊत यांनी याप्रसंगी केले.

फोटो : ०६केआरडी०१

कॅप्शन : घोटील, ता. पाटण येथील जंगल परिसरातील वणवे रोखण्यासाठी ग्रामस्थांनी जाळरेषा काढली.

Web Title: A village united to prevent floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.