शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: माहिती न देणं पडलं महागात, शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 19:21 IST

मुराद पटेल  शिरवळ: खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती ...

मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दणका देत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिरवळ ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून बबनराव धायगुडे हे कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी यांनी धायगुडे यांच्याकडे लेखी स्वरुपात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. माञ संबंधित माहिती धायगुडे यांनी न दिल्याने इम्रान उर्फ पप्पू काझी यांनी खंडाळा पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. यावेळी संबंधितांनी आदेश देऊनही ग्रामविकास अधिकारी धायगुडे यांनी माहिती न दिल्याने तक्रारदार यांनी पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांच्याकडे 20 डिसेंबर 2022 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी तक्रारदार इम्रान उर्फ पप्पू काझी यांचा दाखल केलेला तक्रारी अर्ज मान्य करीत ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती न दिल्याप्रकरणी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश सुनावला. तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित दंड मासिक वेतनातून वसुल करण्याचा आदेश दिला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताCourtन्यायालय