राज्य माथाडी, जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रांत डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST2021-07-17T04:29:18+5:302021-07-17T04:29:18+5:30

वाई : वाई पंचायत समितीचे उपसभापती पै विक्रांत डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या ...

Vikrant Dongre as the District President of Rajya Mathadi, General Workers Union | राज्य माथाडी, जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रांत डोंगरे

राज्य माथाडी, जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रांत डोंगरे

वाई : वाई पंचायत समितीचे उपसभापती पै विक्रांत डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या शिफारशीनंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी त्यांची निवड केली. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

‘वाई तालुक्याला जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने वाई पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याचा अभिमान वाटतो,’ असे मत वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले. निवडीबद्दल वाई पंचायत समितीमध्ये भय्यासाहेब डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, सुधीर भोसले, राष्ट्रवादी संघटक संजय कांबळे, उद्योजक प्रशांत निकम, माजी सभापती रजनी भोसले, माजी उपसभापती अनिल जगताप, मोहन चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vikrant Dongre as the District President of Rajya Mathadi, General Workers Union