विजय भटकर यांना ‘अंनिस’चे आव्हान

By Admin | Updated: July 30, 2014 23:39 IST2014-07-30T23:36:39+5:302014-07-30T23:39:57+5:30

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लॅँचेटचा वापर झाला.

Vijay Bhatkar's challenge to 'Anyan' | विजय भटकर यांना ‘अंनिस’चे आव्हान

विजय भटकर यांना ‘अंनिस’चे आव्हान

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लॅँचेटचा वापर झाला. याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी प्लॅँचेट मार्फत खुनाचा तपास शक्य आहे, असे समर्थन जाहीर केले आहे. ते खरे असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती भटकर यांना प्लॅँचेट करून खुनाचा तपास करावा, असे आव्हान देत आहे.
‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील. डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांनी याबाबात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपास करण्यासाठी प्लॅँचेट करणाऱ्यांची मदत घेण्यात आली, ही बाब अत्यंत निषेधार्र्ह आहे. घडलेल्या प्रकाराला जबाबदार घटकांशी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका ‘अंनिस’ने घेतली असताना प्लॅँचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे, असे वक्तव्य विजय भटकर यांनी केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मान्यता मिळविलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे समर्थन समाजासाठी दिशाभूल करणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतारणा करणारे ठरते.
विजय भटकर यांनी प्लॅँचेट प्रकाराने खुनाचा तपास करणे शक्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान अंश्रधद्धा निर्मूलन समिती करीत आहेत. याबरोबरच कुठल्याही चमत्कार व अतिंद्रिय शक्तीचा दावा करणाऱ्या व प्लॅँचेटमार्फत तपासाच्या सिद्धतेसाठी अंनिस २१ लाखांचे बक्षीस देण्यास तयार आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vijay Bhatkar's challenge to 'Anyan'