कोरोना रोखण्यासाठी प्रभाग समित्यांची दक्षता महत्त्वाची : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:20+5:302021-03-20T04:39:20+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढत होत आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठित करण्यात आलेल्या ...

Vigilance of ward committees is important to prevent corona: Collector | कोरोना रोखण्यासाठी प्रभाग समित्यांची दक्षता महत्त्वाची : जिल्हाधिकारी

कोरोना रोखण्यासाठी प्रभाग समित्यांची दक्षता महत्त्वाची : जिल्हाधिकारी

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढत होत आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठित करण्यात आलेल्या प्रभाग समित्या व ग्रामीण भागासाठी गठित करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीने करावयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार कोविड संक्रमित प्रति रुग्णामागे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान २५ नागरिकांचा शोध घेणे बंधनकारक आहे. कोविड संक्रमित रुग्ण सापडल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा ७२ तासांच्या आत शोध घेण्यात यावा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण करावे. कोविड संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अथवा प्रवासात आलेल्या नागरिकांची हाय रिस्क व लो रिस्क अशी वर्गवारी करून हाय रिस्कमधील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

संपर्कात आलेल्या हाय रिस्क नागरिकांची जास्तीत जास्त कोविड तपासणी होईल याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. संपर्कात आलेल्या नागरिकांना गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण करणे बंधनकारक राहील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी शहरी भागासाठी मुख्याधिकारी नगरपालिका यांची असेल, तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामस्तरीय समितीची असेल. त्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग संबंधित वैद्यकीय अधिकारी व आशा वर्कर यांची भूमिका महत्त्वाची असेल.

संपर्कात आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर, रॅटद्वारे टेस्ट करावी. यामध्ये आरटीपीसीआरला प्राधान्य द्यावे. ज्या व्यक्तींना कोविड-१९ लक्षणे (सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे इ.) आढल्यास त्यांचीसुद्धा विहित मुदतीत कोविड तपासणी होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढलेली आहे अशा भागात घर टू घर सर्वेक्षण (तपासणी) करावे, तसेच कोविड संक्रमित रुग्णांची संख्या ज्या भागात, क्षेत्रात, ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी पुरवठा करणारे दूध विक्रेते, भाजी विक्रेते, दुकानदार यांची तात्काळ रॅट टेस्ट करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Vigilance of ward committees is important to prevent corona: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.