शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लम्पीच्या अटकावासाठी आता गावपातळीवर दक्षता समिती, सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार

By नितीन काळेल | Updated: September 28, 2022 19:52 IST

लम्पीबाबत गतीने उपाययोजना राबवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून कामकाज होणार

सातारा : जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता लम्पी आजाराला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरीय सर्वेक्षण व दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लम्पीबाबत गतीने उपाययोजना राबवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून कामकाज होणार आहे.जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव पसरत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू असून, जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. या रोगाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना मनुष्यबळ कमी असले, तरी शासनाच्या निर्णयानुसार ५४ कंत्राटी पदांची तत्काळ भरती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खासगी पशुपदविकाधारकांनाही मदतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पशुपालकांनी आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करून न घेतल्यामुळे व पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क न साधल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर उपचार तत्काळ मिळाल्यास हा रोग बरा होत आहे. मात्र, आजारी जनावरांची माहिती मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असून, रोगप्रसारही होत आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर दक्षता बाळगून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यात येत आहे.सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील प्रगत पशुपालक यांचा समितीत समावेश आहे. या आजाराची लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणे, आजारी जनावरांचे विलगीकरण करणे, गावातील सर्व गोठे जंतुनाशक औषधांनी फवारून घेणे, गावातील बैलगाडी शर्यतीस प्रतिबंध करणे, जनावरांच्या लसीकरणाची खात्री करणे, जनावरांच्या खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध करणे, आजाराबाबत जनजागृती ग्रामसभेत व अन्य कार्यक्रमांमध्ये करणे ही कामे ही समिती करणार आहे.

जनावरांच्या लम्पी आजाराला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आता ग्रामस्तरावर सर्वेक्षण व दक्षता समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीमार्फत गावांमध्ये जनजागृती करणे, लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणे, आजारी जनावरांचे विलगीकरण करणे यासारखी कामे होणार आहेत. - विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद