कास पुष्प पठारावर विघ्नहर्त्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:21 IST2019-09-02T23:21:17+5:302019-09-02T23:21:21+5:30
विघ्नहर्ता : सह्याद्रीच्या व सातपुडा रांगेत ही वेलवर्गीय वनस्पती पाहावयास मिळते. तीन पानांच्या पाकळीची ही वेल इतर वनस्पतींच्या आधाराने ...

कास पुष्प पठारावर विघ्नहर्त्याचे दर्शन
विघ्नहर्ता : सह्याद्रीच्या व सातपुडा रांगेत ही वेलवर्गीय वनस्पती पाहावयास मिळते. तीन पानांच्या पाकळीची ही वेल इतर वनस्पतींच्या आधाराने वाढते. पानांच्या खाचीतून बाहेर आलेले त्याचे फूल गणपतीच्या सोंडेसारखे दिसते. यावरून यास विघ्नहर्ता तसेच हत्तीची सोंड म्हणतात. याच्या मुळाशी लांब आकाराचा गोड चवीचा कंद असतो. सप्टेंबर महिन्यात यास लांबट स्वरुपाची शेंग येते. त्याच्या आतील दाणे गोड, तुरट असतात. याकडे पक्षी व कीटक आकर्षित होतात.
जरतरी : ही वेलवर्गीय वनस्पती आहे. लालसर रंगाचे फूल असते. फुले, पानावर तूस असतात. बिया उडदासारख्या असतात. रताळ्यासारखा कंद जमिनीत असतो. ‘प्फ्लेमें जिया’ असे या फुलाचे शास्त्रीय नाव. तसेच हिलुरी असे ग्रामीण भागात म्हणतात. या फुलाची छबी कैद करण्याचा मोह आवरत नाही.
नीलिमा : मुरडानिया सिप्लँक्स असे म्हणतात. निळ्या रंगाची तीन पाने असतात. डोळ्यांसारख्या काळसर रंगाचे तीन भाग असतात. तसेच तीन कोंब असतात. ही वनस्पती गवत वर्गीय प्रजातीतील आहे. त्यामुळे हे फूल पाहिल्यामुळे आल्हाददायी वाटत असते.
गाववेली : ही वेलवर्गीय आहे. पिपाणीच्या आकाराचे फूल असते. आयफोमिया असे शास्त्रीय नाव आहे. काळी व पांढरी गवेली असे दोन प्रकार असतात. हे पांढऱ्या गवेलीचे फूल आहे.
आभाळी : ही गवतवर्गीय वनस्पती आहे. याची पाने व देठ जाडसर असतो. त्याच्यावर सप्टेंबर महिन्यात आभाळी रंगाचे कप्या कप्याचे फूल येत असते. त्याच्यावर अनेक भाग दिसतात.