उभ्या ट्रकला कारची धडक; एक ठार, तीन जखमी
By Admin | Updated: March 9, 2017 13:40 IST2017-03-09T13:40:24+5:302017-03-09T13:40:24+5:30
सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत अपघात

उभ्या ट्रकला कारची धडक; एक ठार, तीन जखमी
उभ्या ट्रकला कारची धडक; एक ठार, तीन जखमी
आॅनलाईन लोकमत
शेंद्रे (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये एक युवक जागीच ठार असून, इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.
ट्रक (एमएच १६ एएफ १५७९) या ट्रकला कार (एमएच ४८ एस २५२५)ने धडक दिली. अपघातानंतर काही नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले. अपघातातील ठार झालेली व्यक्ती व जखमी मुंबईचे असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.