वेटणे झाले जलस्वयंपूर्ण ग्राम
By Admin | Updated: November 9, 2014 23:26 IST2014-11-09T22:07:21+5:302014-11-09T23:26:26+5:30
राजकारणविरहित काम : बंधाऱ्यांच्या माध्यमातून गाव झाले जलमय

वेटणे झाले जलस्वयंपूर्ण ग्राम
पुसेगाव : दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात वेटणे गावाची भूजलपातळी कमालीची खालवली होती. गावच्या ओढ्याचे पाणी दिवाळीनंतर पाहायला मिळत नव्हते; पण मागील दुष्काळाबासून बोध घेऊन गावकऱ्यांनी ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. जूनच्या पहिल्याच पावसात सर्व बंधारे भरून वाहू लागले. हे सारे पाहताना हाच का दोन वर्षांपूर्वीचा ओढा, असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.
मागील दुष्काळ, नापिकी, चारा छावणीचा घ्यावा लागलेला आधार या सर्व गोष्टींवर मात कण्याचा चंग सरपंच पोपटराव नलवडे व ग्रामपंचायत सदस्यांनी बांधला. राजकारण आड न आणता गावच्या भल्यासाठी प्रथम मुख्यमंत्री निधीतून दोन बंधारे मंजूर केले.
त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यामातून दोन व आमदारांच्या विकास निधीतून दोन बंधारे अशा सहा बंधाऱ्यांचे काम बघता बघता पूर्ण झाले आणि आज नेर धरणात फक्त वेटणेच्या ओढ्याचा पाणी आजतागायत सुरू असल्याचे पाहायाला मिळत आहे.
या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यापर्यंत विहिरींमधील पाणी टिकणार आहे. आज गावातील ९० टक्के विहिरींची पाणीपातळी जमिनीबरोबर असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी विकासनिधी कसा वापरायचा, याचा उत्तम नमुना म्हणून वेटणे गावाने आदर्श उभा केला आहे.
बंधारे उभारणीच्या कामी वेटणेचे ग्रामपंचायात सदस्य विमल नलवडे,स् ांजय नलवडे, हणमंत देवकर, शांताबाई नलवडे, संजय कोरडे, मनीषा खरात या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली. (वार्ताहर)
सलग दुष्काळाने शेतकरी कोलमडून गेला होता. काहीही करून पावसाचे पाणी अडविणे ही काळाची गरज होती. म्हणून आज ६ बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. कोणतेही राजकारण न करता जर काम केले तर मोठ्या प्रमाणात यश मिळते.
- पोपटराव नलवडे, सरपंच, वेटणे