शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विक्रेत्यांनी भरविला बाजार

By सचिन काकडे | Updated: May 14, 2025 19:34 IST

सातारा : सातारा पालिकेने जाहीर केलेल्या नो हॉकर्स झोनचा प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित ...

सातारा : सातारा पालिकेने जाहीर केलेल्या नो हॉकर्स झोनचा प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित विक्रेत्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाजार भरवून उपोषण सुरू केले. या अनोख्या उपोषणाची शहरात दिवसभर चर्चा झाली.मोती चौक ते ५०१ पाटी या रस्त्यावर छोटे-मोटे विक्रेते गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. शहराची ही मुख्य बाजारपेठ असल्याने शहरी व ग्रामीण भागांतील नागरिक येथे मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. सण, उत्सव काळात रस्त्यावरील विक्रेते, दुकानांचे साहित्य, लोखंडी जाळ्या, दुचाकी वाहने, आदींमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ती टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोती चौक ते ५०१ पाटी या मार्गावर नो हॉकर्स झोन जाहीर केला. विक्रेत्यांना या मार्गावर बसण्यास निर्बंध घालण्यात आले. संबंधित विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तरीदेखील या विक्रेत्यांनी विविध संघटनांचा हाताशी धरून पालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.मंगळवारी पालिकेतील बैठक निष्फळ ठरल्याने या विक्रेत्यांनी बुधवारपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. काही विक्रेत्यांनी उपोषणस्थळी बाजार भरवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पालिका प्रशासनाकडून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन