निवडणूक प्रक्रि येला वेग

By Admin | Updated: March 22, 2016 23:30 IST2016-03-22T23:17:19+5:302016-03-22T23:30:58+5:30

लासलगाव : बाजार समितीसाठी २७२ इच्छुकांचे अर्ज

The velocity of election process | निवडणूक प्रक्रि येला वेग

निवडणूक प्रक्रि येला वेग

 लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आजअखेर २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
शुक्रवारी व शनिवारी निफाड प्रांत कार्यालयात कर्ज भरण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघाच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण- सात जागा, महिला राखीव- दोन जागा, इतर मागासवर्गीय- एक जागा, विमुक्त जाती/ भटक्या जमातीसाठी- एक जागा, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या- चार जागांसाठी अर्ज दाखल झाले असून, सर्वसाधारण दोन
जागांसाठी, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीकरिता एक जागा, आर्थिक दुर्बल घटकाकरिता एक जागा, व्यापारी मतदार संघाच्या दोन जागा, तर हमाल-मापारी मतदारसंघाच्या एका जागेकरिता मतदान होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. शशिकांत मंगरूळे काम पाहत आहे. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप आहेर हे काम पाहत आहे. वैद्य हे सहायक म्हणून काम पाहत आहे.
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील तसेच विद्यमान सदस्य नानासाहेब पाटील, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, विजय सदाफळ, इंदुमती तासकर, तान्हाजी पूरकर, शिवाजी तासकर, बबन सानप, शिवाजी ढेपले, नंदकुमार डागा,
सचिन ब्रम्हेचा, दिलीप गायकवाड, सुभाष कराड, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, दत्तात्रय डुकरे, मधुकर गायकर, ज्ञानेश्वर गांगुर्डे,
अशोक गवळी, भीमराज काळे, आशिष मोगल, रामकृष्ण दराडे, अनिल क्षीरसागर, विशाल पालवे, सुनील शिंदे, संजय वाकचौरे बाळासाहेब दराडे आदिंचा समावेश आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांमुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याने वाढणारी इच्छुकांची गर्दी नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे. तिसरे पॅनल तयार करण्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. तिरंगी लढत होण्याचे संकेत प्राप्त होत आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामकाज पाहत आहे. भुजबळ ईडीच्या कारवाईत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे समर्थक काय करणार, याची चर्चा सुरू आहे.
छगन भुजबळ हे कारवाईमुळे प्रत्यक्ष येथे नसले तरी आम्ही भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जाणार आहोत, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The velocity of election process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.