वासुदेवालाही उदयनराजेंची झप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:07 IST2018-11-28T23:06:55+5:302018-11-28T23:07:00+5:30

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे एक अजब रसायन आहे. त्यांना कधी काय आवडेल, याचा काही नेम नाही. कधी ...

Vasudevali Udayanraazni zapi | वासुदेवालाही उदयनराजेंची झप्पी

वासुदेवालाही उदयनराजेंची झप्पी

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे एक अजब रसायन आहे. त्यांना कधी काय आवडेल, याचा काही नेम नाही. कधी शेतात शेतकरी नांगरट करताना दिसला तर त्याचे औत चालविणार तर कधी गवताने भरलेल्या बैलगाडीचे सारथ्य करणार. कलाकार हा तर त्यांचा विक पॉर्इंट. असाच एक वासुदेव त्यांना पार्किंगमध्ये सापडला आणि त्यालाही उदयनराजेंची जादूची झप्पी मिळाली. उदयनराजेंच्या या झप्पीने वासुदेवालाही आभाळ ठेंगणं झालं.
समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करण्याची किमया खासदार उदयनराजे भोसले यांना चांगली जमते. त्यामुळेच त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला
आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना भेटलेल्या वासुदेवाला त्यांनी संपूर्ण गाणे म्हणायला लावले. वासुदेवानेही अत्यंत तन्मयतेने ते गाणे म्हटले.
वास्तवातील अनेक गोष्टी त्याने आपल्या गाण्यातून मांडल्या. या गाण्यातील ‘समदं माझं-माझं...काही नाही वेड्या तुझं...फकस्त धरतीला तुझं वझं...सारा मायेचा बाजार...सारं इथंच राहणार...बघ ही काया दोन घडीची...पोकळ माया नाही कामाची...’ या ओळी उदयनराजेंना अधिक भावल्या. त्यामुळे ते संपूर्ण गाणे पूर्ण होईपर्यंत थांबले आणि त्याच्या गाण्याला मनापासून दादही दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी वासुदेवाला घट्ट मिठी मारत जादूची झप्पीही दिली.

Web Title: Vasudevali Udayanraazni zapi