वर्षा देशपांडे यांचा गौरव
By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:07:40+5:302014-12-09T23:23:47+5:30
देशपांडे यांनी दलित चळवळीला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या विठ्ठजली उमाप यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

वर्षा देशपांडे यांचा गौरव
सातारा : समाजहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना वत्सला प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार अॅड. वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. यावर्षीचा पुरस्कार गर्भलिंग निदान रोकण्यासाठी भारतभर काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रात कायद्याचा वचक निर्माण करणाऱ्या अॅड. वर्षा देशपांडे यांना देण्यात आला.
कमी होणारी मुलींची संख्या वर्षा देशपांडे यांच्या प्रयत्नामुळे वाढताना दिसत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईच्या महापौर आशा आंबेकर आणि विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला उमप यांच्या हस्ते हा पुरस्कार अॅड. वर्षा देशपांडे यांना देण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना वर्षा देशपांडे यांनी दलित चळवळीला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या विठ्ठजली उमाप यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच स्त्रियांना समानता प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या विठ्ठल उमप यांनी संपूर्ण आयुष्य शाहिरी चळवळीला वाहून घेतले. त्यांची मैना गावाकडे राहिली या गीताचा उल्लेख करून बेळगाव अजूनही महाराष्ट्राचा भाग होत नाही याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवाजी साटम, चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप आणि वत्सला उमप याही उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)