अंगापूर : ‘वर्णे गावात विकासकामांसाठी भविष्यात कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही. गावात विविध प्रकारची विकासकामे होऊ घातली असून, ती दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने योगदान द्यावे,’ असे मत आमदार महेश शिंदे यांनी याठिकाणी व्यक्त केले.
आमदार निधीतून तब्बल दहा लाख रुपये खर्चाच्या वर्णे गावातून डोंगराकडे जाणाऱ्या काँक्रिट रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नजीकच्या काळात गावामध्ये संत गोरोबाकाका चौक परिसर, जानाईनगर मुख्य चौक परिसर याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, विठ्ठल मंदिर परिसर, आबापुरी येथील श्री काळभैरव मंदिर परिसर सुशोभिकरण, याच ठिकाणी नवीन अंगणवाडी
इमारत तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेत दोन नवीन वर्ग खोल्या शौचालयासह बांधणे, ही कामे होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ही सर्व कामे गाव विकासाची असून, त्यासाठी ग्रामस्थांनी दुजाभाव विसरत एकजुटीने ही कामे दर्जेदार व टिकाऊ करून घेण्यासाठी सहकार्य करावे व अजून इतर काही विकासकामे करावयाची असल्यास आपणास सूचित करावे. त्याच पाठपुरावा करून ती मंजूर करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
११अंगापूर
वर्णे (ता. सातारा) येथे काँक्रिट रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार महेश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : संदीप कणसे)