वर्धन कारखाना ९ सप्टेंबरला सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:26+5:302021-09-02T05:25:26+5:30
औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास ...

वर्धन कारखाना ९ सप्टेंबरला सुरू करणार
औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरला वर्धन कारखाना सुरू करणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन धैर्यशील कदम यांनी बुधवारी केले.
खटाव तालुक्यातील त्रिमली-घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो कारखान्याच्या पाचव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, संचालक भीमराव पाटील, सत्त्वशील कदम, दत्तात्रय साळुंखे, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, संजय माने, नीलेश माने, सतीश भोसले, रामचंद्र येवले, भूषण देशमुख, संतोष पाटील, विठ्ठल चव्हाण, तुकाराम पवार, महादेव पवार, जयसिंग पवार, अंकुश कदम, वसंत यादव, दिनकर शिंगाडे, दिलीप जाधव, रामचंद्र दबडे, किशोर येवले, आदी उपस्थिती होती.
धैर्यशील कदम म्हणाले, कारखाना लवकर सुरू करून जास्त दिवस चालविण्याचा मानस व्यवस्थापनाचा आहे. हंगामामध्ये जास्तीत जास्त दिवस कारखाना चालविण्यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक ती कामे पूर्ण केली असून, शिस्तबद्ध नियोजन, समाधानी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासाने कारखाना प्रगतिपथावर आहे. येणारा गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, तोडणी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्यांनी अजून ऊसनोंदणी केली नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऊसनोंदणी करावी.
फोटो : वर्धन ॲग्रोचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी धैर्यशील कदम, सुनीता कदम, विक्रमशील कदम यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)