वादळी वाऱ्यामुळे वर्धन ॲग्रोचे गोदाम भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:57+5:302021-05-11T04:41:57+5:30
औंध : वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या घाटमाथ्यावरील वर्धन ॲग्रो कारखान्याचे जाॅगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोदाम ...

वादळी वाऱ्यामुळे वर्धन ॲग्रोचे गोदाम भुईसपाट
औंध : वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या घाटमाथ्यावरील वर्धन ॲग्रो कारखान्याचे जाॅगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोदाम भुईसपाट होऊन अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, औंधसह परिसरात सलग तीन दिवस उन्हाळी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो साखर कारखान्यावर साखर आणि जाॅगरी पावडर साठवणूक करण्यासाठी बांबू आणि टारपोलीन कागदापासून अंदाजे ६० बाय २५० फूट लांबीचे दक्षिण उत्तर गोदाम तयार करण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि धुवांधार पावसाने गोदाम अक्षरशः भुईसपाट झाले. टारपोलीनचा छत फाटून आतील जाॅगरी पावडर आणि इतर साहित्याचे अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आज घटनास्थळी महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
१०औंध
फोटो:-वादळी वाऱ्यामुळे वर्धन ॲग्रो कारखानास्थळावरील गोदामाचे नुकसान झाले आहे.
(छाया : रशीद शेख)