वर्धन अॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:19+5:302021-02-05T09:17:19+5:30
औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात ...

वर्धन अॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक
औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र आर. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापनशास्त्र निरीक्षक एस. जी. धोपाटे, क्षेत्रसहायक निरीक्षक व्ही. के. शिंदे कोरेगाव विभाग यांनी केली. त्यावेळी वजन काट्यामध्ये काहीही तफावत नसल्याचे आढळले.
चालू गळीत हंगामातील उत्पादित होणाऱ्या मालाला स्वदेशी तसेच परकीय बाजारपेठामध्ये चांगला भाव मिळत असून, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देण्यास कटिबद्ध आहे. गळितास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची भूमिका कारखान्याची असल्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले. कारखानदारी ही ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर व कर्मचारी या त्रिसूत्रीवर उभी असून, यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचे काम वर्धन अॅग्रोच्या माध्यमातून केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्याची भूमिका कारखान्याची आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित डुबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, शेती अधिकारी वैभव नलवडे, परचेस ऑफिसर, अश्विन कदम, केनयार्ड सुपरवायझर योगेश कदम, हारूण संदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशोक देशमुख, प्रशांत घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी डुबल यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन केले.
०३वर्धन कारखाना
फोटो:-वर्धन अॅग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याची पथकाकडून तपासणी करण्यात आली.(छाया-रशिद शेख)