वरदा घाडगे जिल्ह्यात पहिली
By Admin | Updated: June 7, 2014 00:09 IST2014-06-07T00:05:57+5:302014-06-07T00:09:42+5:30
एमएच-सीईटी : महाराष्ट्रात २५४ वा क्रमांक

वरदा घाडगे जिल्ह्यात पहिली
सातारा : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून आवश्यक असणाऱ्या ‘एमएच-सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत सातारा येथील वरदा विकास घाडगे जिल्'ात ५५२ गुण मिळवून पहिली तर राज्यात २५४ वी आली. ती लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येथील चेतन संजय यादव (५०९) तर नम्रता एकल (५०६) हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
‘एमएच-सीईटी’ परीक्षा दि. ८ मे रोजी झाली होती. सातारा जिल्'ातून या परीक्षेसाठी ३,४०५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी ३,२८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ११६ विद्यार्थी गैरहजर राहिले. (प्रतिनिधी)