जिल्हा परिषद शिक्षकांचे मोलाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:42 IST2021-08-25T04:42:59+5:302021-08-25T04:42:59+5:30
वडूज : कोरोना महामारीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खटाव (वडूज) पंचायत ...

जिल्हा परिषद शिक्षकांचे मोलाचे योगदान
वडूज : कोरोना महामारीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खटाव (वडूज) पंचायत समिती शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम व शैक्षणिक प्रयोग राबविले जात आहेत. यासाठी जिल्हा परिषद शिक्षक आपापल्या परीने मोलाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमात खटाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमाद्वारे शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीने खटाव तालुक्यात गुणवत्ता कक्षाची स्थापना करून पहिली बैठक वडूज पंचायत समिती येथे पार पडली. त्यात गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी गुणवत्ता कक्षाच्या उद्देश व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख मोहन साळुंखे, प्रमोद जगदाळे, प्राचार्य विजयकुमार पिसाळ, ग्यान प्रकाशन फाउंडेशनचे विशाल बडे, अभिजित भालेराव आदी उपस्थित होते.
खटाव तालुक्यात पहिली ते बारावी पर्यंत ३४५ शाळा व १९७० शिक्षक कार्यरत असून त्यातील काही शिक्षकांची गुणवत्ता कक्षाच्या सदस्यपदी निवड केली आहे. या गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणातून व ज्या मुलांना मोबाईल नाहीत. अशा मुलांना घरी जाऊन ऑफलाइन शिक्षणातून मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे त्यात सातत्य ठेवणे, ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांची उपस्थिती, मुलांची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेणे, गृहभेटी, सकारात्मक व पालकांच्या उपस्थितीनुसार ऑनलाईन शिक्षण,शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगासने व विविध खेळ,पालक व मुलांचे व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करणे, उद्दिष्ट आणि अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, अध्यापन शास्त्र समजून घेणे, पालकांची कार्यशाळा व बैठक घेणे, गावस्तरावर इतर नियोजन करणे आदी अनेक गोष्टींवर गुणवत्ता कक्ष काम करणार आहे.
(चौकट)
खटाव तालुका गुणवत्ता कक्ष सदस्य
गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, अधिव्याख्याता डॉ. सतीश फरांदे, विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, मोहन साळुंखे, तुकाराम सादव, शिक्षण तज्ज्ञ आनंदराव ओंबासे, शिवाजीराव जाधव, दिलीप बनसोडे, मुख्याध्यापक विजयकुमार पिसाळ, चंद्रकांत सुतार, जगन्नाथ खाडे, पदवीधर शिक्षक याकूब नदाफ, रवींद्र पवार, प्राथमिक शिक्षक रेखा कोरडे, अलका पिसाळ, प्रांजली नलवडे, योगिता गोसावी, धनंजय कुलकर्णी, रमजान इनामदार, विषय तज्ज्ञ गणेश पवार, लक्ष्मण जाधव, अजित गुंड, जगन्नाथ राऊत, विशेष शिक्षक मनीषा शिंदे, सचिन बरळ, महेश जाधव, विशाल बडे, अभिजीत भालेराव.