गोवारेच्या सरपंचपदी वैभव बोराटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:12+5:302021-02-27T04:51:12+5:30

गोवारे, ता. कराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैभव बोराटे यांची, तर उपसरपंचपदी विजय पाटील यांची ९ विरूध्द ४ मतांनी ...

Vaibhav Borate as Sarpanch of Goware | गोवारेच्या सरपंचपदी वैभव बोराटे

गोवारेच्या सरपंचपदी वैभव बोराटे

गोवारे, ता. कराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैभव बोराटे यांची, तर उपसरपंचपदी विजय पाटील यांची ९ विरूध्द ४ मतांनी निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

यावेळी नवनियुक्त सदस्य शुभांगी कोळगे, स्वानंद माळी, ज्योती गुरव, मीनाक्षी कदम, शबाना मुल्ला, शर्मिला गुजट्टी, छाया महाडिक व विरोधी सदस्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

गोवारे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी प्रणित पॅनलने १३पैकी ९ जागा जिंकल्या आहेत. विरोधी पॅनलला २ व अपक्ष २ आशा ४ जागा मिळाल्या आहेत. सरपंच व उपसरपंच निवडीच्या बैठकीत मतदान प्रक्रिया पार पडली. सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे सरपंचपदी वैभव बोराटे यांची, तर उपसरपंचपदी विजय पाटील यांची ९ विरूध्द ४ मतांनी निवड झाली. निवडीनंतर सदस्यांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

फोटो :

Web Title: Vaibhav Borate as Sarpanch of Goware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.