शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखांचा आज शेवटचा मुक्काम, ‘वाघनखां’ची जागा घेणार शिवरायांच्या हाताच्या पंजाचा ठसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:44 IST

ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार

सातारा : साताऱ्यातील संग्रहालयात गेल्या सहा महिन्यांपासून विसावलेल्या ऐतिहासिक वाघनखांचा शुक्रवारी (दि. ३१) शेवटचा मुक्काम आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात आठ महिन्यांसाठी विसावा घेणार आहेत.वाघनखांची उणीव भरून काढण्यासाठी संग्रहालयातील ‘त्या’ दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा, साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनख ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे.लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दि. १९ जुलै २०२४ रोजी दाखल झाली. दि. २३ जुलैपासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्यगाथा हे शस्त्र प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील ४ लाख २० हजार नागरिकांनी या संग्रहालयाला भेट दिली.पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर १ फेब्रुवारी ते २ ऑक्टाेबर २०२५ पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर ते ३ मे २०२६ पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

..या वस्तूही महत्त्वाच्याछत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा पंजा संग्रहालयात आहे. हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटविण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञ ग. ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केले होते. म्हसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा ५० वर्षांपूर्वी संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला. या शिवाय साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तूंचे येथे संवर्धन करण्यात आले आहे. वाघनखांच्या दालनात यापैकी एक वस्तू ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज