वडजल देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:20+5:302021-02-05T09:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माण तालुक्यातील वडजल येथील वडजाई देवस्थानला अखेर ‘क’ वर्ग दर्जा ...

वडजल देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माण तालुक्यातील वडजल येथील वडजाई देवस्थानला अखेर ‘क’ वर्ग दर्जा मिळाला आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्यासह ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.
याबाबत अनिल देसाई म्हणाले, ‘वडजल देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. तसेच वडजलकरांना निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची शब्दपूर्ती केल्याचे समाधान वाटत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
वडजाई देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, निधीअभावी या देवस्थानचा विकास रखडला होता. त्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. त्यामुळे वडजलचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्यारीतीने सुविधा देता येणार आहेत, असे सांगण्यात आले.
\\\\\\\\\\\\\\\\\\\