कोरोना काळात लस गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:23+5:302021-09-14T04:45:23+5:30
रामापूर : पाटण येथील गजानन बाल सेवा मंडळ हे दरवर्षीप्रमाणे काहीतरी नावीन्य जपत, सामाजिक संदेश देत गणपती उत्सव साजरा ...

कोरोना काळात लस गरजेची
रामापूर : पाटण येथील गजानन बाल सेवा मंडळ हे दरवर्षीप्रमाणे काहीतरी नावीन्य जपत, सामाजिक संदेश देत गणपती उत्सव साजरा करत असते. राज्यात आणि तालुक्यातदेखील कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कोरोनाशी लढायचे असल्यास लस हाच आता एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु अजूनही नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. म्हणून या मंडळाने कोरोना काळात सर्वांनी लस घ्या, याचे आव्हान करताना गणपती साकारण्यात आला. मंडळ नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्मिक विषयावर गणेशमूर्ती साकारण्यात अग्रेसर असते. यावर्षीही कार्यकर्त्यांनी अतिशय सुबक, समाजप्रबोधन करणारी व देखणी गणेशमूर्ती तयार करून समाजापुढे पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला. यामधे तरुण कलाकार असून, जुन्या ज्येष्ठ कलाकारांनी मार्गदर्शनातून मदत केली. या मूर्ती कोरोना संदेश देत असल्याने पंचक्रोशीतून मंडळांचे कौतुक होत आहे. ही संकल्पना चंद्रकांत साबळे, मूर्तिकार सुशांत कुंभार, नरेंद्र कुंभार, उदय कुंभार, जगन्नाथ कुंभार, वेदांत कुंभार यांची आहे.