पसरणीमध्ये एकाच दिवशी हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:36+5:302021-09-12T04:44:36+5:30
वाई : पसरणी आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत पसरणी यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत पसरणी उपकेंद्र अंतर्गत ...

पसरणीमध्ये एकाच दिवशी हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
वाई : पसरणी आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत पसरणी यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत पसरणी उपकेंद्र अंतर्गत असणाऱ्या पसरणी, कुसगाव, विठ्ठलवाडी, एकसर या गावांमधील नागरिकांचे लसीकरण मोहीम पसरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसरणी येथे राबविण्यात आली होती.
या उपक्रमासाठी पसरणी आरोग्य उपकेंद्रातील सर्व कर्मचारी पसरणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती पसरणी अनेक स्वयंसेवकांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच पसरणी जिल्ह्यातील उल्लेखनीय उपक्रम करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली. याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वप्निल गायकवाड, डॉ. देवेंद्र यादव, डॉ. पूजा खिरड, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य पसरणी, कुसगाव, एकसर, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रत्नाकर गायकवाड, सुवर्णा फरांदे, किशोरी बनकर, गीता तिके, योगेश पाटील, वैभव पवार, रोहित गायकवाड, विनायक वाडकर, उत्तम गाढवे, अमोल मदन महांगडे, मंगेश शिर्के, नितीन महांगडे, अक्षय मोहिते, ओमकार शिंदे, भांगरे सर व सर्व स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसरणी, पोलीस पाटील पसरणी संदीप प्रभाळे, वृषाली महांगडे, यांनी विशेष परिश्रम घेतले.