खाण्याचा सोडा वापरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:09+5:302021-09-03T04:41:09+5:30

सचिन काकडे लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलप्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे आता घरच्या घरी व खाण्याचा सोडा ...

Using baking soda | खाण्याचा सोडा वापरून

खाण्याचा सोडा वापरून

सचिन काकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जलप्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे आता घरच्या घरी व खाण्याचा सोडा (अमोनियम बायकार्बोनेट) वापरून विसर्जन करता येऊ शकते. सोडा म्हणजेच अमोनियमन बायकाबोर्नेटमुळे मूर्तीचे शास्त्रीय पद्धतीने विघटन करता येते. केवळ ४८ तासांतच मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते.

सातारा जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी शाडू मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचीच सर्वाधिक प्रतिष्ठापना केली जाते. शाडू मूर्ती पाण्यात सहज विरघळते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे विहिरी, तलाव व नद्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंगही पाण्यात मिळतात. त्यामुळे जलसृष्टीचीदेखील प्रचंड हानी होते. परंतु, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधनातून महत्त्वाची बाब पुढे आली आहे. बेकरीमध्ये वापरला जाणारा खाण्याचा सोडा म्हणजेच अमोनियम बायकार्बोनेटमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे शास्त्रीय पद्धतीने विघटन करता येते.

घरी मूर्ती विसर्जन करताना बादली, पिंप अथवा मोठ्या टाकीत पाणी घ्यावे. त्यामध्ये मूर्तीच्या उंचीनुसार अमोनियमन बायकाबोर्नेट टाकावे. या पाण्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विसर्जित केल्यानंतर ती अवघ्या ४८ तासांतच विरघळते.

(चौकट)

नंतर खत म्हणून करा पाण्यात वापर

मूर्ती विरघळून तयार झालेले पाणी अमोनियम सल्फेट असते. हे पाणी फेकून न देता त्याचा झाडांना खत म्हणून पुन्हा वापर करता येऊ शकतो. या पाण्यामुळे झाडांची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.

(चौकट)

४८ तासांच विरघळते मूर्ती

प्लास्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणास हानिकारण असते. यापासून तयार झालेल्या मूर्तींचे अनेक दिवस विघटन होत नाही. मात्र, अमोनियमन बायकाबोर्नेटमुळे मूर्ती विरघळण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू होते. केवळ ४८ तासांतच मूर्तीचे विघटन होते. या प्रक्रियेमुळे जलप्रदूषण टाळणे शक्य होत आहे.

(कोट)

जनजागृती हवी

जिल्ह्यासह सातारा शहरात पूर्वी नदी व विहिरींमध्ये मूर्ती विसर्जन केले जात होते. अलीकडे कृत्रिम तळी व घरांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याचे प्रमाण वाढले आहे. अमोनियमन बायकार्बोनेटमुळे प्लास्टर ऑफ पॅरिस जलदगतीने विरघळते ही बाब अद्याप अनेकांना माहीत नाही.

- विकास जाधव, मूर्तीकार, सातारा

(चौकट)

पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री

२०१९ १७००० ५०००

२०२० ११५०० ९०००

२०२१ ९००० ११०००

(चौकट)

असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण

मूर्तीची उंची - पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये) - खाण्याचा सोडा (किलो)

७ ते १० इंच ८ १

११ ते १४ इंच २२ ४

१५ ते १८ इंच ४५ ६

Web Title: Using baking soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.